Monday, September 25, 2017

प्रार्थना संगीत

प्रार्थना संगीत
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कलाकेंद्र (गुरुकुल) आणि भारतीय लोककला अभ्यास संशोधन व कल्याण केंद्र तर्फे महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त ‘प्रार्थना संगीत’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
विविध धर्मांतील प्रार्थना व संतांच्या रचनांची प्रस्तुती या कार्यक्रमात केली जाणार आहे. हिंदू, बौद्ध, पारसी, ख्रिश्चन, इस्लाम, शीख इ. धर्मांतील नीति कल्पना, तत्वज्ञान आणि देवता वर्णन असलेल्या, तसेच संस्कृत, प्राकृत, अवेस्ता, अरबी, इंग्लिश, गुजराथी, पंजाबी, बंगाली, हिंदी, मराठी अशा विविध भाषांतील प्रार्थनांचा समावेश या कार्यक्रमात आहे. रागसंगीत व लोकसंगीतावर आधारित या रचना संगीत विभागातील बी.ए. व एम.ए.चे विद्यार्थी या कार्यक्रमात करणार आहेत. या मैफलीची संकल्पना, निरुपण व संगीत दिग्दर्शन प्रा. चैतन्य कुंटे यांचे आहे.
सोमवार दि. २ ऑक्टोबर २०१७ रोजी सकाळी ९.३० वा. ‘प्रार्थना संगीत’ हा कार्यक्रम संत नामदेव सभागृह, खेर वाङमय भवन येथे संपन्न होईल. या कार्यक्रमास सर्व श्रोत्यांस मुक्त प्रवेश आहे.
Prarthana Sangeet
Centre of Performing Art (department music, dance and drama) and National centre for folk performing arts studies research and welfare under Savitribai Phule Pune University is going to present ‘Prarthana Sangeet’, a special recital on the occasion of birth anniversary of Mahatma Gandhi.
The prayer songs of various religions and especially the compositions performed in Sabarmati Ashram will be presented in this recital, based on Ragas as well as folk music. These prayers explain the morals and philosophy of various religions such as Hindu, Buddhist, Parsi, Christian, Islam, Sikh, etc. The prayer songs are in many languages such as Sanskrit, Prakrit, Arabic, Avesta, Hindi, Punjabi, Marathi, etc. The students of B.A. and M.A. music are going to perform these prayer songs. The concept, narration and music direction is by Prof. Chaitanya Kunte.
‘Prarthana Sangeet’ will take place on Monday, October 2 2017 at 9:30 am. The venue is Sant Namdeo Auditorium in University campus. Entry is open to all


No automatic alt text available.

No comments: