Saturday, February 21, 2009

Report on 1st day of Abhisheki Sammelan

Report on 1st day of Abhisheki Sammelan






गायन, वादन आणि नृत्याचा अनोखा मिलाफ असलेल्या "स्वर तालयात्रा' या कलाविष्काराने रसिक शुक्रवारी मंत्रमुग्ध झाले. सहवादन आणि जुगलबंदीच्या माध्यमातून स्वर, ताल, लय आणि नादाची अनुभूती देणाऱ्या कार्यक्रमाने "पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सवा'स सुरवात झाली.

तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान, आपला परिसर ट्रस्ट आणि नगरसेवक उज्ज्वल केसकर यांच्यातर्फे आयोजित "पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सवा'चे उद्‌घाटन ज्येष्ठ तबलावादक तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते झाले. विद्याताई अभिषेकी, आमदार गिरीश बापट, नगरसेवक अनिल शिरोळे, भरत वैरागे, गणेश बिडकर, मनीष साळुंके आणि योगेश गोगावले या वेळी उपस्थित होते. 'सकाळ' या महोत्सवाचा माध्यम प्रायोजक आहे.

पं. तळवलकर यांनी या कार्यक्रमामागची संकल्पना सांगितली. ते म्हणाले, "गायन, वादन आणि नृत्य यातून केवळ संगीताचा आविष्कार होतो. पंरपरेमध्ये नवतेची मूल्ये सामावली आहेत आणि नवतेला परंपरेचा साज असतो.'' या कार्यक्रमात त्यांच्यासह सत्यजित तळवलकर, चारुदत्त फडके (तबला), ओंकार दळवी (पखवाज), श्रीधर पार्थसारथी (मृदंग), तन्मय देवचक्के (हार्मोनिअम), रवी चारी (सतार), अनय गाडगीळ (सिंथेसायझर), संदीप कुलकर्णी (बासरी) यांचा सहभाग होता. शौनक अभिषेकी आणि रघुनंदन पणशीकर यांच्या गायन साथीने कार्यक्रमात रंग भरला. शांभवी वझे, परिमल फडके, कावेरी आगाशे, मुक्ती श्री आणि शीतल कोलवालकर यांनी नृत्याचे सादरीकरण केले. इशान कौशल, सावनी तळवलकर आणि मयंक बेडेकर यांनी पढंत गायनाची साथ केली.

'महादेव शंकर' या शिववंदना बंदिशीने कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर राग 'सोहनी'ची "चलो हटो पियॉं' ही आडा चौतालाची रचना सादर करण्यात आली. स्वर, ताल आणि भरतनाट्यम-कथक नृत्य यांच्या जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध झाले. राधा-कृष्ण स्तुतीपर रचना आणि "ललत' रागातील तराणा सादर झाला. उत्तरार्धात तळवलकर यांनी विविध मात्रांचे लालित्यपूर्ण सादरीकरण केले. ज्येष्ठ नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

Shaniwar Wada Festival

http://www.premjoshua.com/images/concert_pune.jpg

The eighth edition of the Shaniwar Wada Festival will commence on the 21st of February 2009 in the city. This year’s festival is a tribute to the late danseuse Rohini Bhate who passed away last year.

21st Feb

The festival will open with a dance performance by her students, who will be performing her favourite compositions, followed by performances by Rohini Bhate school and Shama Bhate schools. The first day will close with a debut dance performance by Barkha Sharma, wife of Rahul Sharma. She will perform the ‘Ganesh Vandana’ in Mohoniattam style. Rahul Sharma will also perform a santoor recital.

22nd Feb

On the second day of the festival, Shobhana Chandrakumar will perform the dance ballet ‘Maya Raavan’. Shobhana Chandrakumar is a National award winning Bharatnatyam dancer. The ‘Maya Raavan’ has already made waves in Mumbai when it was performed there and now it comes to Pune on request.

Venue: Shaniwar Wada, Shaniwar Peth

Date: 21st and 22nd February 2009