Thursday, January 17, 2013

कै. पं. यशवंतबुवा जोशी श्रद्धांजली संगीत - सभा


कै . पं . यशवंतबुवा जोशी यांना श्रद्धांजली संगीत - सभा गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे आयोजित केली आहे. 
ग्वाल्हेर घराण्याची गायकी परंपरा वाढविणारे बुजुर्ग खयाल गायक तसेच अनेक ज्येष्ठ गायकांचे गुरू असणाऱ्या यशवंतबुवांचे  गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये मुंबई येथे निधन झाले होते. यशवंतबुवा मूळ पुण्याचे. तेथे त्यांनी पं. मिराशीबुवांकडे गायनाचे सुमारे १२ वर्षे शिक्षण घेतले. यानंतर गायनातच मुशाफिरी करण्याचे त्यांनी ठरविले. १९५० च्या सुमारास ते मुंबईत आले. मुंबईत पं. जगन्नाथबुवा पुरोहित (गुणिदास) यांच्याकडे त्यांनी शिक्षण घेतले. गजाननबुवा जोशी यांच्या गायकीचाही त्यांच्यावर प्रभाव होता. 













सर्व संगीत रसिकांना सस्नेह निमंत्रण.




स्थळ : गांधर्व महाविद्यालय, मेहुणपुरा, शनिवार पेठ, पुणे
यथील "विष्णू-विनायक स्वर मदिर"



वेळ : सायंकाळी ६.३० वा.
सोमवार, दि. २१ जानेवारी २०१३ : गायन - श्रीमती मिताली भौमिक ( न्यू -जर्सी ), गायन - पं. सुहास व्यास.





मंगळवार, दि. २२ जानेवारी २०१३ :गायन - श्रीमती शोभा जोशी, एकल संवादिनी वादन - पं. विश्वनाथ कान्हेरे.


साथसंगत - श्री. भरत कामत, श्री. प्रशांत पांडव ( तबला ),
श्री. प्रमोद मराठे, श्री. मिलिंद कुलकर्णी, श्री उमेश पुरोहित ( संवादिनी )



CONCERT: Shradha Suman - Pt. Kishan Maharaj Smruti Samaroh