Friday, April 9, 2010

काटकोन त्रिकोण

खूप दिवसांपासून जे नाटक मी पाहायचे ठरवत होतो ते शेवटी काल पाहिले. डॉ. विवेक बेळ्ये लिखित आणि गिरीश जोशी दिग्दर्शित "काटकोन त्रिकोण". अप्रतिम नाटक. गेल्या २ ३ वर्ष मध्ये पाहिलेले सर्वात चांगले नाटक!



नाटकाचा विषय तसा विवेक बेळ्ये यांच्या आवडीचाच विषय. लग्न आणि कुटुंब संस्था. कथानक जर समजून घ्यायचे असेल तर या नाटकाच्याच भाषेत बोलायचे झाले तर 'तुम्हाला थोडे बेसिक गणित माहित असणे आवश्यक आहे, खरे तर भूमिती'! विवेक बेळ्ये यांचा नेहेमीचा शैली मधले संवाद आणि झपाट्याने बदलत जाणारे आणि त्यामुळे खिळवून ठेवणारी पटकथा यामुळे नाटक अतिशय रंगतदार होते. संवादाची शैली खास 'माकडाचा हाती शॅम्पेन' ची आठवण करून देणारी आहे, पण नाटकाच्या शेवटी शेवटी थोडासा का होईना, एकसुरीपणा आणणारी अशी वाटते. विवेक बेळ्ये, केतकी थत्ते आणि मोहन आगाशे या सर्वच कलाकारांचा अभिनय सहज सुंदर असा आहे. आजच्या काळातील महत्वाचा विषय अश्या सुंदर नाटकाद्वारे समोर आणल्या बद्दल डॉ. बेळ्ये यांचे अभिनंदन.

नाटक नक्की पहाच.