Swaramayee Gurukul organizes
Harmonium recital by DR. ARAWIND THATTE
Accompaniment: Charudatta Phadke (Tabla)
Sunday, 21st June, 2009, 6.00pm
Venue: Swaramayee Gurukul premises, (Opp. Sambhaji Park, adjacent lane to Hotel ShivSagar), J.M.Road, Pune - 411004.
Programme not ticketed - open to all music lovers
Review of the concert from Shri Chaitanya Kunte:
डॉ. अरविंद थत्ते : स्वरमयी गुरुकुलात रंगलेली मैफल
विख्यात हार्मोनिअमवादक व गुरु डॉ. अरविंद थत्ते यांची रवि. दि. २१ जून ०९ रोजी डॉ. प्रभा अत्रे यांच्या ’स्वरमयी गुरुकुलात’ स्वतंत्र हार्मोनिअमवादनाची मैफल झाली. त्यांनी प्रथम गौरी हा सायंकालीन राग सादर केला. या रागात शुद्ध रागरुपाची अनुभूती देणारे आलाप व तिश्र, मिश्रजातीच्या लयकारीने नटलेली विलंबित रुपक तालात गत डॉ. थत्ते यांनी वाजवली. नंतर त्यांनी अतीशय विस्तारपूर्वक व अनेक सांगीतिक सौंदर्यस्थळांचा वेध घेत पं. कुमारगंधर्व यांनी निर्माण केलेला धुनउगम राग मालवती पेश केला. मैफलीचा समारोप करताना डॉ. अरविंद थत्ते यांनी वाजवलेल्या राग मारुबिहाग या रागातील पंचरुपक या अनवट तालातील एक टप्पा व अतीद्रुत लयीतील गतीत झालावादन विशेष आकर्षक ठरले. डॉ. प्रभा अत्रे यांची सुप्रसिद्ध बंदिशही त्यांनी वाजवून दाद घेतली. त्यांना अतिशय पोषक अशी तबला संगत चारुदत्त फडके यांनी केली. स्वत: डॉ. प्रभा अत्रे यांसह पुण्यातील अनेक कलाकार व विद्यार्थ्यांनी डॉ. अरविंद थत्ते यांच्या या विलक्षण तयारीच्या, प्रभावी वादनाला उपस्थित राहून दाद दिली.