Tuesday, March 19, 2013

CONCERT: Guru-Shishya Parampara (Concert by Nilesh Dhakras, Sameer Dublay)


भुसारी कॉलोनी नागरिक मंच आयोजित व मनहर संगीत सभा प्रस्तुत


गुरु शिष्य परंपरा 

  • दिनांक ३ १ मार्च रविवार सायंकाळी सहा वाजता 
  • स्थळ : उजव्या भुसारी कॉलोनी मधील जनसेवा बँक जवळील भुसारी कॉलोनी च्या कम्युनिटी सभागृह कोथरूड पुणे 
कलाकार
निलेश धाक्रस 
(प. समीर दुबळे यांचे शिष्य )

पं . समीर दुबळे 
( कै. पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य )

साथसंगत : 
माधव मोडक 
प्रवीण कसलीकर
 


भुसारी कॉलोनी नागरिक मंच चे श्री अविनाश दंडवते यांच्या पुढाकारामुळे व 'सवंगडी' या जेष्ठ नागरिक संघाच्या सहकार्यामुळे पाहता पाहता क्लब कानसेन या संकल्पनेला दोन वर्ष येत्या मे महिन्यात मध्ये पूर्ण होतिल. पहिल्या वर्षी राग संकल्पनेवर आधारित कृष्ण रंग , कंस प्रकार ,कल्याण प्रकार, तोडी प्रकार ,भैरवी दर्शन, भैरव प्रकार , असे विविध विषय घेऊन पाच कार्यक्रम केले . या मध्ये कल्पना झोकरकर , श्रीनिवास जोशी, डॉक्टर रेवती कामत ,अपर्णा गुरव , आरती ठाकूर , अपर्णा केळकर प्रज्ञा देशपांडे, अनुजा झोकरकर अशा सुप्रसिद्ध कलाकारांनी उत्तम रित्या सादरीकरण केले होते . रसिकांनी या कलेचा स्वाद घेताना च या बद्दल माहिती देखील जाणून घेतली हे या उपक्रमाचे यश असेच म्हणावे लागेल . 

क्लब कानसेन च्या दुसर्या वर्षी गुरु शिष्य परंपरा हा विषय घेतला असून स्वत: गुरु व त्यांचे नवोदित होतकरू शिष्य गाणार आहेत . पं मोहनकुमार दरेकर व त्यांचे शिष्य तसेच पं राजेंद्र कंदलगावकर व त्यांचे शिष्य यांचे सुंदर स्वराविष्कार रसिकांना ऐकायला मिळाले या कार्यक्रमामध्ये गुरु पं समीर दुबळे व त्यांचे शिष्य श्री निलेश धाक्रस यांचे गायन ऐकायला मिळणार . 


दिनांक ३१ मार्च२०१३ रविवार रोजी सायंकाळी सहा वाजता क्लब कानसेन चा ३ रा कार्यक्रम नेहमीच्याच ठिकाणी म्हणजे उजव्या भुसारी कॉलोनी मधील जनसेवा भुसारी कॉलोनी च्या कम्युनिटी सभागृहामध्येच होणार आहे.
गुरु शिष्य परंपरा हा मैफिलीचा विषय असून अलीकडचे काळात दिले जाणारे राग संगीताचे शिक्षण , विद्यार्थ्यांची तयारी गुरु शिष्य परंपरा , व मैफिल असे विषय ऐकायला मिळतील पंडित समीर दुबळे हे स्वत: पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य असून उत्तम तयारीचे गवैय्ये ,गायक कलाकार सुप्रसिद्ध आहेत सवाई गंधर्व मधील गायन रसिकांनी गौरविलेले आहे. व संगीत विषयातील ते नामवंत तज्ञ म्हणून प्रख्यात आहेतच . फ्लेम या विद्यापीठामध्ये ते प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.