Saturday, May 29, 2010

RasaYatra: 100th birth anniversary of Pt Mallikarjun Mansoor

Sakal, new age foundation presents 'RasYatra' on the occasion of 100th birth anniversary of Pt Mallikarjun Mansoor.


The program featutes:

1. 'Soor Mansoor' - A lec-demo by Priyadarshini Kulkarni


2. 'Mallikarjun Anna' : an article by Sunita Deshpande - Abhivachan by Amrita Satbhai


3. Gharana Gayaki - Ek Avalokan: Amarendra Dhaneshwar, Vikas Kashalkar and Priyadarshini Kulkarni


29th May /2010, 6:30 PM

Venue: S.M.Joshi auditorium, near Patrakar Bhavan, Pune

Saturday, May 8, 2010

CONCERT: Savani Shende

प्रतिभा संपन्न लोकप्रिय गायिका सावनी शेंडे - साठ्ये प्रस्तुत "स्वराविष्कार"

( रात्रीच्या रागांची मैफल - खयाल, ठुमरी, दादरा)
तबला: निखील फाटक
संवादिनी: राहुल गोळे

शनिवार ८ मे रात्री ९:३०
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह

Friday, May 7, 2010

Koshih

CONCERT: Pt. Suhas Vyas

साधना कला मंच आयोजित मैफल
गायन: पंडित सुहास व्यास
हार्मोनियम: जयराम पोतदार
तबला: महेश कानोळे
शनिवार ७ मे सायंकाळी ६:३०

डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरिअल फौन्डेशन संगीत महोत्सव २०१० (वर्ष २२ वे)

डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरिअल फौन्डेशन, चिंचवड आयोजित
संगीत महोत्सव २०१० (वर्ष २२ वे)
शुक्रवार ७ मे सायंकाळी ५:३०
- गायन: शशांक मक्तेदार
- सतार वादन: परिमल सदाफळ
- कथक: शांभवी वझे

शनिवार ८ मे सायंकाळी ५:३०
- गायन: कुमुदिनी काटदरे, रवींद्र घांगुर्डे, शुभदा पराडकर
- बासरी: राकेश चौरासिया

स्थळ: रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड
सर्वाना सस्नेह निमंत्रण

Thursday, May 6, 2010

वासंतिक संगीत नाट्य महोत्सव - वर्ष २० वे

वासंतिक संगीत नाट्य महोत्सव - वर्ष २० वे

गुरुवार ६ मे ते मंगळवार ११ मे
सायंकाळी ५:३०
भरत नाट्य मंदिर
सिझन तिकीट ५००, ३०० आणि २०० , नाट्यगृहावर उपलब्ध

६ मे: संगीत ययाती आणि देवयानी
७ मे: संगीत शारदा
८ मे: संगीत मत्स्यगंधा
९ मे: संगीत मानापमान
१० मे: संगीत हे बंध रेशमाचे
११ मे: संगीत कट्यार काळजात घुसली

प्रमुख कलाकार: चारुदत्त आफळे, संजीव मेहेंदळे, गौतम मुर्डेश्वर, रवींद्र खरे, रवींद्र कुलकर्णी, स्वरप्रिया बेहेरे, गौरी पाटील, कविता टिकेकर, डॉ. राम साठ्ये, भक्ती पागे, नयना आपटे

Sunday, May 2, 2010

आनंद भाटे सादर करणार तीन दिग्गजांचे अभंग

नटसम्राट बालगंधर्व, स्वरराज छोटा गंधर्व आणि स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेले अभंग आता किराणा घराण्याचे युवा गायक आनंद भाटे यांच्या स्वरांतून ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. रविवारी (ता. 2) एस. एम. जोशी सभागृह येथे सायंकाळी सहा वाजता भाटे यांच्या अभंग गायनाचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे.

या कार्यक्रमात भाटे यांना राजीव परांजपे (ऑर्गन), प्रसाद जोशी (तबला), नंदू भांडवलकर (पखवाज) साथ करणार आहेत, तर माउली टाकळकर टाळवादनाने या अभंगगायनामध्ये रंग भरला जाणार आहे. लहानपणीच आपल्या मधुर गायनाने 'आनंद गंधर्व' हा किताब पटकाविलेला नूमवि प्रशालेचा विद्यार्थी आनंद भाटे यांनी पं. यशवंतबुवा मराठे यांच्याकडे गायनाचे प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर 1988 पासून पं. भीमसेन जोशी यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतले. चंद्रशेखर देशपांडे यांच्याकडून त्यांना नाट्यगीतांचे मार्गदर्शन मिळाले आहे.

कार्यक्रमाविषयी भाटे म्हणाले, 'पं. भीमसेनजी या माझ्या गुरुजींची "संतवाणी' मी ऐकली आहे. या कार्यक्रमाला त्यांनी आपल्या अलौकिक स्वरांनी उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्या पातळीपर्यंत पोचण्यास मला किती जन्म लागतील देव जाणे; पण त्यांच्याकडून जे शिकता आले ते लोकांपर्यंत सादर करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. शास्त्रीय संगीताचा पाया असलेल्या अभंगगायनाच्या माध्यमातून भक्तिभाव हा नकळतपणे शास्त्रीय गायन न कळणाऱ्यांपर्यंत पोचतो. "जय जय राम कृष्ण हरी' या गजरापासून सुरवात करून या तीन दिग्गजांचे अभंग सादर करणार आहे. एखादे हिंदी किंवा कानडी भजनदेखील सादर करण्याचा मानस आहे.