Monday, July 4, 2016

स्मृती सभा - विदुषी डॉ. वीणा सहस्रबुद्धे

ग्वाल्हेर घराण्याच्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या गायिका गुरुवर्य विदुषी डॉ. वीणा सहस्रबुद्धे यांचे दि. २९ जून २०१६ रोजी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचे कुटुंबीय, शिष्य परिवार आणि गांधर्व महाविद्यालयातर्फे , शुक्रवार, दि. ८ जुलै रोजी , सायंकाळी ६:०० वाजता , गांधर्व महाविद्यालयाच्या विष्णू-विनायक स्वरमंदिर (मेहुणपुरा शनिवार पेठ , पुणे ) येथे "स्मृती सभा " चे आयोजन केले आहे.
या स्मृती सभेमध्ये पं. शरद साठे, पं. संजीव अभ्यंकर , विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे इत्यादी मान्यवरांचा प्रत्यक्ष सहभाग असून, इतरही अनेक मान्यवर कलाकारांच्या वीणाताईंबद्दलच्या आठवणी दृक्श्राव्य माध्यमातून ऐकायला आणि पाहायला मिळतील.
वीणाताईंच्या आणि भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताच्या चाहत्यांनी या सभेस जरूर उपस्थित राहावे.
अधिक माहितीसाठी संपर्क : श्री. अतुल खांडेकर. (९९२२४४२४३८/ ९४२२५१६८११/ atulrkhandekar@gmail.com )