जालन्यात जन्मलेल्या अप्पा जळगावकर सुरूवातीला ध्रुपद गायकी करायचे. ४० वर्षांपूर्वी ते पुण्यात आले आणि पुण्याचेच होवून गेले. ध्रुपद गायकीच्या मैफीलमध्ये सुरूवातीला त्यांचे मन रमायचे. नंतर त्यांनी हार्मोनियम वादनाला सुरूवात केली. हार्मोनियम वादनासाठी त्यांनी कोणत्याही गुरूकडून ज्ञान घेतले नाही. परंतु, हार्मोनियम वादनात त्यांनी स्वतःचे असे स्थान निर्माण केले.
पुण्यात आल्यावर त्यांची ओळख स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्याशी झाली. त्यानंतर पंडितजींच्या बहुतांशी मैफलीत ते आपल्या बहारदार हार्मोनियम वादनाने रंग भरू लागले. त्यांनी किशोरी अमोणकर, कुमार गंधर्व, मालिनी राजूरकर, माणिक वर्मा यांनाही साथ दिली आहे. लहेरा आणि तालाचे त्यांना उत्तम ज्ञान होते. संगीत शास्त्राचे त्यांना उत्तम ज्ञान होते.
चार वर्षांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे ते अंथरूणाला खिळून होते. त्यात किडनीचा त्रास सुरू होता. आज सकाळी सहा वाजता त्यांच वृध्दपकाळाने निधन झाले. त्यांच्या पत्नी शालिनीताई जळगावकर यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या तालमीत अनेक हार्मोनियम वादक तयार झाले. मोठ्या शिष्य गणात मुकुंद फडकरी, राहुल देशपांडे ही काही नावाजलेली नावे आहेत.
सकाळी साडे अकराच्या सुमारास वैकुंठ स्मशान भूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Wednesday, September 16, 2009
ज्येष्ठ हार्मोनिअम वादक अप्पा जळगावकर यांचे निधन
ज्येष्ठ हार्मोनिअम वादक अप्पा जळगावकर यांचे आज सकाळी ६ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.
त्याचे वादन अत्यंत संयमी होते. कोणत्याही कलाकारच्या गायनाप्रमाणे त्याचे हार्मोनियम वादन होते. आपली जोड त्यात ते कधीही देत नव्हते. परंतु, इतर वेळी ते आपल्या हार्मोनियम वादनाने मजा आणत असतं. ते कलाकार म्हणून जेवढे मोठे होते. तेवढे माणूस म्हणून मोठे होते. प्रेम, शांत असल्याने ते ख-याअर्थाने जग्नमित्र होते, असे स्वरांनंद प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त प्रकाश भोंडे यांनी अप्पांच्या आठवणींना उजाळा दिला.
Subscribe to:
Posts (Atom)