Excerpts of Smt. Jayashri Patanekar's concert on 27-Sep-09.
Wednesday, September 30, 2009
मन्ना डे यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
अजरामर संगीताने आणि जादुई आवाजाने भारतीय चित्रपटसृष्टीला अनमोल योगदान देणारे मन्ना डे यांना केंद्र सरकारने सन २००७ चा दादासाहेब फाळके पुरस्कार आज (बुधवार) जाहीर केला. दोन लाख रुपये, सुवर्णकमळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते मन्ना डे यांच्या उत्तूंग संगीत कारकीर्दीचा गौरव करण्यात येईल. नुकतेच जाहीर झालेले राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फाळके पुरस्कार यांचे वितरण एकाचवेळी होईल. कार्यक्रमाची तारीख अजून निश्चित झालेली नाही. केंद्र सरकारच्या माहिती मंत्रालयातर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. १९६९ मध्ये देविका राणी यांना पहिला फाळके पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर २००० मध्ये आशा भोसले या फाळके पुरस्कारच्या मानकरी ठरल्या. मन्ना डे यांचे मुळ नाव प्रबोधचंद्र डे. रविंद्र संगीताची जन्मभूमी असलेल्या कोलकत्यात एक मे १९१९ रोजी त्यांचा जन्म झाला. सुमधूर रविंद्र संगीताचा त्यांच्यावर विलक्षण प्रभाव आहे. ९० वर्षे वयाच्या मन्ना डे यांनी हिंदीसह बंगाली, भोजपूरी, मगध, पंजाबी, मराठी, मैथिली, आसामी, उडिया, गुजराती, कोकणी, कन्नड, मल्याळी, अवधी, छत्तीसगढी अशा विविध भाषांमध्ये संगीत आणि पार्श्वगायन केले. एका अर्थाने त्यांनी भारतीयत्वच संगीताच्या माध्यमातून उभे केले. केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण देऊनही गौरविले आहे. देवदास, आवारा, सीमा, बरसात की रात, झनक झनक पायल बाजे, दो बिघा जमीन, देख कबिरा रोया, श्री ४२०, चोरी चोरी, मदर इंडिया, मधुमती अशा पन्नास आणि साठच्या दशकातील गाजलेल्या चित्रपटांना मन्ना डे यांचा स्वर लाभला. १९४३ पासूनची त्यांची कारकीर्द अगदी २००५ पर्यंत सुरू राहिली. *दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त कलावंताचे/तंत्रज्ञाचे नाव (कंसात पुरस्कार वर्ष) देविकाराणी - १९६९ बी.एन.सरकार - १९७० पृथ्वीराज कपूर - १९७१ पंकज मलिक - १९७२ सुलोचना - १९७३ बी.एन.रेड्डी - १९७४ धीरेन गांगुली - १९७५ काननदेवी - १९७६ नितीन बोस - १९७७ आर.सी.बोराल - १९७८ सोहराब मोदी - १९७९ पी.जयराज - १९८० नौशाद अली - १९८१ एल.व्ही.प्रसाद - १९८२ दुर्गा खोटे - १९८३ सत्यजीत रे - १९८४ व्ही.शांताराम - १९८५ बी.नागी रेड्डी - १९८६ राज कपूर - १९८७ अशोक कुमार - १९८८ लता मंगेशकर - १९८९ अकिनो नागेश्वर राव - १९९० भालजी पेंढारकर - १९९१ भूपेन हजारिका - १९९२ मजरुह सुल्तानपुरी - १९९३ दिलीपकुमार - १९९४ डॉ. राजकुमार - १९९५ शिवाजी गणेशन - १९९६ कवी प्रदीप - १९९७ बी. आर. चोप्रा - १९९८ हृषिकेश मुखर्जी - १९९९
अशोक पत्की यांची संगीत कार्यशाळा
अशोक पत्की यांची संगीत कार्यशाळा अशोक पत्की, श्रीधर फडके, देवकी पंडित यांची संगीत कार्यशाळा दि. ३१ अक्टोबर रोजी पुणे येथे सुरू होत आहे. ही कार्यशाळा ८ दिवस असेल. कार्यशाळेत सहभाग घेण्यासाठी इच्छुक असलेल्या संगीत प्रेमींनी शैला दातार, भारत गायन समाज, यांच्या कडे संपर्क साधावा