Thursday, April 18, 2013

CONCERT: Anande Aiken : Pt Shounak Abhisheki, Pt Hemant Pendse


" आनंदे ऐकेन " : राग संगीताची जाणीव वाढविणारी एक सुरेल मैफिल………

शास्त्रीय संगीताच्या प्रांतामध्ये माहितीपूर्ण व दर्जेदार अशा संवाद मैफिलींची दहा कार्यक्रमांची मालिका करण्याचा मानस प्रसिध्द गायक व पं जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य श्री हेमंत पेंडसे व शास्त्रीय संगीत प्रेमी व सुप्रसिध्द बांधकाम व्यावसायिक विलास जावडेकर यांचा आहे. यातील पहिले पाच कार्यक्रम कोथरूड येथे बाल शिक्षण सभागृहामध्ये रसिकांच्या उदंड प्रतिसादामध्ये संपन्न झाले . आता उर्वरित काही कार्यक्रम हे सवाई गंधर्व स्मारक ( राहुल थिएटर, शिवाजी नगर ) येथे औंध ,शिवाजीनगर ,विद्यापीठ परिसर येथील रसिकांच्या साठी असणार आहेत. या मैफिलिची संकल्पना हेमंत पेंडसे यांची असून या मध्ये हेमंत पेंडसे ह्यांचे सादरीकरणासह निवेदन लाभाणार आहे. या शिवाय शास्त्रीय संगीतामधील एका दिग्गज कलाकाराचे गायन देखील ऐकायला मिळणार आहे.

शास्त्रीय संगीताच्या परिघाबाहेर असलेल्या श्रोत्यांची शास्त्रीय संगीत ऐकण्याची रुची कशी वाढेल हा प्रमुख हेतू ठेऊन या मैफिलींचे आयोजन केले जाणार आहे. नेहमीच्या मैफिलीमध्ये गायक मंडळी गाऊन निघून जातात .मात्र श्रोत्यांना गायकाने मांडलेल्या रागाबद्दल वा त्या गायकांच्या संगीत विचाराबद्दल बरेच काही जाणून घेण्याची फार उत्कंठा असते .ती या मैफिलीमंधून निमित्ताने पूर्ण होईल
सुप्रसिद्ध तबला वादक श्री. हर्षद कानेटकर व सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक श्री . श्रीराम हसबनीस यांची साथ संगत या कार्यक्रमासाठी लाभणार आहे .
दिनांक २१ एप्रिल २०१३ रोजी रविवारी सायंकाळी 6 वाजता हेमंत पेंडसे यांच्या संकल्पनेमधून साकारलेल्या " आनंदे ऐकेन " , या कार्यक्रमामध्ये पं शौनक अभिषेकी यांचे मारवा थाटाच्या च्या प्रकारांवर शास्त्रीय गायन होणार आहे. त्या नन्तर म्हणजे मध्यंतरानंतर मारवा रागाशी निगडीत अश्या सुगम /नाट्य गीतांची मैफिल व संवाद मैफिल होणार आहे. या मध्ये पं शौनक अभिषेकी ,संगीतकार गायक हेमंत पेंडसे यांच्याशी प्रसिध्द कवी आणि पेडीयाट्रिक डेंटल सर्जन डॉक्टर राहुल देशपांडे हे संवाद साधणार आहेत . विलास जावडेकर इको होम्स कंपनी या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहे. मनहर संगीत सभेतर्फे आयोजित केला जाणारा हा कार्यक्रम रसिक श्रोत्यांसाठी पूर्णपणे विनामुल्य आहे .पहिल्या चार रांगा राखीव असुन प्रथम येणाऱ्यास प्राधान्याने प्रवेश दिला जाईल . रविवारी सायंकाळी सहा वाजता दिनांक २१ एप्रिल २०१३ रोजी हा कार्यक्रम सवाई गंधर्व स्मारक राहुल चित्रपट गृहा शेजारी शिवाजीनगर पुणे , येथे हा कार्यक्रम होणार आहे. 
स्थळ : सवाई गंधर्व स्मारक राहुल चित्रपट गृहा शेजारी शिवाजीनगर पुणे , 
दिनांक व वेळ : दिनांक २१ एप्रिल २०१३ रोजी रविवारी सायंकाळी 6 वाजता

प्रवेश : विनामुल्य ( पहिल्या चार रांगा राखीव )

1 comment:

pune flats said...

nice posts... Get your Dream Home, 2bhk flat in Pune, shops information available here.