Sangeet Vimarsha: Lecture-Demonstration by Dr. Arawind Thatte
Dr. Arawind Thatte, the veteran Harmonium player is also well known for his fundamental thoughts on music. In his book ‘Sangeet Vimarsha’, he has written about many of his original theories and thoughts about Hindustani Art music.
Maharashatra Cultural Centre has organized a 4-day Lecture-demonstration by Dr Arawind Thatte. In this Lec-dem, Dr Thatte will explain his thoughts on Graam-Murchhana-Shruti-Swar system, Tanpura, Raag Rachana & Vistaar, Bandish, Laya-Taal-Theka, Tanta Ang – Gayaki Ang, Dhrupad Ang – Khayal Ang. This Lec-dem will be held at Sudarshan Rangamanch, Shaniwar Peth, Pune from 20th to 23rd Feb. 2012 (Monday to Thursday), 6 pm to 8 pm. For registration, contact Maharashtra Cultural Centre’s office (020-24430803) or Chaitanya Kunte (keshavchaitanya@gmail.com). Entry fees: Rs. 400/- (4 days), Rs. 150/- (per day).
******************************
"संगीत विमर्श" : डॉ. अरविंद थत्ते यांची सप्रयोग व्याख्यानमाला
विख्यात हार्मोनिअमवादक डॉ. अरविंद थत्ते हे संगीतावर मूलगामी विचार करणारे व्यासंगी अभ्यासक म्हणून सुपरिचित आहेत. त्यांनी विकसित केलेली एकल हार्मोनिअमवादनाची व स्वरजुळणीची पद्धती प्रस्थापित आहेच, शिवाय संगीताच्या मूलभूत स्वरूपाबद्दल त्यांनी केलेला विचार त्यांच्या ’संगीत विमर्श’ या ग्रंथात मांडला आहे. महाराष्ट्र कल्चरल सेंटर या संस्थेने डॉ. अरविंद थत्ते यांची एक विशेष सप्रयोग व्याख्यानमाला आयोजित केली आहे. या सप्रयोग व्याख्यानमालेत डॉ. अरविंद थत्ते हे या विषयांवर आपले विचार मांडणार आहेत -
ग्राम – मूर्छना – श्रुति - स्वरव्यवस्था, तानपुरा, रागरचना व विस्तार, बंदिश, लय – ताल - ठेका विचार, तंत अंग - गायकी अंग, ध्रुपद अंग - खयाल अंग
संगीताचे विद्यार्थी व प्रगत साधक अश्या दोन्ही गटांसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल. चार दिवसांची ही व्याख्यानमाला दि. २० ते २३ फेब्रुवारी २०१२ (सोम. ते गुरु.) रोजी रोज सायं. ६ ते ८ वा. सुदर्शन रंगमंच येथे होणार आहे. पूर्ण उपक्रमासाठी सहभाग शुल्क रु.४००/- आहे. नावनोंदणीसाठी महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे कार्यालय (दूरध्वनि क्र. ०२०-२४४३०८०३) वा चैतन्य कुंटे (keshavchaitanya@gmail.com) यांस संपर्क करावा.
1 comment:
Is there any video recording of these LEC-DEMOs available ? Has anyone done it for commercial / personal use ? I would be interested.
Post a Comment