Saturday, February 7, 2009

उस्ताद अल्लारखा पुण्यस्मरण

'सा' व 'नि' सुर संगीत आयोजित
उस्ताद अल्लारखा पुण्यस्मरण


शनिवार दिनांक ७ फेब, सायं. ५:३०
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह

- उस्ताद अल्लारखा यांचा वर माहिती पट
- "ताल कीर्तन" पं. सुरेश तळवलकर यांचा शिष्यांचा आविष्कार
- कौशिकी चक्रवर्ती - शास्त्रीय गायन, ठुमरी
- श्री. योगेश समसी - तबला सोलो



प्रवेश विनामूल्य


----------------------------------------------------------------------------

News from Esakal on this:
पुणे, ता. १ - ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्लारखॉं यांच्या स्मृतिदिनानिमित्त येत्या शनिवारी (ता. ७) "सा' व "नी' सूरसंगीत संस्थेतर्फे संगीत मैफल आयोजिण्यात आली आहे.

ज्येष्ठ तबलावादक पं. सुरेश तळवलकर यांच्या शिष्यांचे "तालकीर्तन', कौशिकी चक्रवर्ती यांचे शास्त्रीय गायन; तसेच अल्लारखॉं यांचे शिष्य योगेश समसी यांचे तबलावादन आदी कार्यक्रम होणार आहेत."सकाळ' या कार्यक्रमाचा माध्यम प्रायोजक आहे.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सायंकाळी साडेपाच वाजता ही मैफल होणार आहे. सुरवातीला "तालकीर्तन' होईल. त्यानंतर "फिल्म्स डिव्हिजन'निर्मित अल्लारखॉं यांच्यावरील लघुपट दाखविण्यात येणार आहे. "अल्लारखॉं यांचे तबल्यातील योगदान' या विषयावर तळवलकर श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर कौशिकी चक्रवर्ती यांचे गायन होईल. त्यानंतर योगेश समसी यांच्या एकल (सोलो) तबलावादनाने या मैफलीची सांगता होणार आहे.

"सा' व "नी' सूरसंगीत संस्थेचे सुरेंद्र मोहिते म्हणाले, ""अल्लारखॉं यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी पुण्यातील तबलावादक आणि सर्व कलाकारांतर्फे कार्यक्रम व्हावा, अशी आमची इच्छा होती. संगीतावर विलक्षण प्रेम करणाऱ्या अल्लारखॉंनी ए. कुरेशी या नावाने 25 चित्रपटांना संगीत दिले, म्हणूनच या कार्यक्रमात तबल्याबरोबरच गायनाचाही समावेश केला आहे. या कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य असून, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे शनिवारी सकाळी साडेनऊपासून "एका व्यक्तीस दोन' याप्रमाणे प्रवेशिका देण्यात येतील.

1 comment:

SM said...

like the information

nice blog

http://realityviews.blogspot.com/