किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पद्मभूषण स्वरयोगिनी डॉ.प्रभा अत्रे यांना मानवंदना म्हणून बासरी फाउंडेशन (आरती-सुयोग कुंडलकर) आणि तेजल क्रिएशन्स (ललिता मराठे) मिळून आयोजित 'स्वरप्रभा' या संगीत मैफलीचं हे दुसरं वर्षं.
ह्या वर्षी कार्यक्रमात आदरणीय प्रभाताईंच्या ११ पुस्तकांचे लोकार्पण हा विशेष योग. ह्यानिमित्त आयोजित संगीत मैफलीत सुप्रसिद्ध गायक कलाकार श्री.जयतीर्थ मेवुंडी आणि श्री.रघुनंदन पणशीकर प्रभाताईंच्या बंदिशी सादर करणार आहेत.
डॉ.विकास कशाळकर प्रभाताईंशी सांगितिक संवाद साधणार आहेत.
श्री.भरत कामत आणि सुयोग कुंडलकर गायनाला साथसंगत करणार असून आनंद देशमुख संपूर्ण कार्यक्रमाचं निवेदन करणार आहेत. ध्वनिसंयोजन 'स्वरांजली'चं आहे.
डॉ.यशवंत थोरात (माजी अध्यक्ष: नाबार्ड) कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असून माजी कृषीमंत्री मा.शशिकांत सुतार यांची विशेष उपस्थिती आहे.
कार्यक्रम शनिवार दि.२१ मे २०१६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे येथे संपन्न होणार आहे.
रसिकांसाठी कार्यक्रमाची तिकिट विक्री यशवंतराव चव्हाण नाट्यगृह,पुणे आणि ग्राहक पेठ येथे आजपासून सुरु झाली आहे.
तसंच ९५९५८ ३०५५५ ह्या मोबाईल क्रमांकावर टेलिफोन बुकींग, ticketees.com ह्या वेबसाईटवर अॉनलाईन बुकींग सुविधा उपलब्ध आहे.