Thursday, January 23, 2014

Wednesday, January 22, 2014

Friday, January 17, 2014

SPICMACAY Overnight concert

Wonderful opportunity to attend an overnight concert. Starts at 9:00 PM on 24th January and ends at 6:00 AM on 25th.

Venue: IISER, Pashan, Pune. (In front of NCL)



Tuesday, January 14, 2014

आदरणीय पं. पुरुषोत्तम वालावलकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

गंधर्वयुग अतिशय जवळून अनुभवलेले एक थोर हार्मोनियमवादक पं. पुरुषोत्तम वालावलकर काळाच्या पडद्याआड …… 

Sudarshan Sangeet Sabha: 28 ; Devotional music from gramophone records


Friday, January 10, 2014

दाजीकाका गाडगीळ यांचे निधन

कळविण्यास अत्यंत दु:ख होते की गांधर्व महाविद्यालय, पुणे च्या विश्वस्त संस्थेचे, म्हणजे "भारतीय संगीत प्रसारक मंडळ, पुणे" या संस्थेचे अध्यक्ष श्री. अनंत गणेश गाडगीळ अर्थात दाजीकाका गाडगीळ यांचे पुणे येथे आज निधन झाले.
११ सप्टेंबर १९१५ रोजी जन्मलेल्या कै. दाजीकाकांचा संस्थेच्या सर्व उपक्रमां मधील सहभाग हा एखाद्या तरुणालाही लाजवेल असा असे. 
त्यांच्या पुण्यात्म्यास शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

Wednesday, January 8, 2014

Vasantotsav 2014


पुणे - छत्तीसगडमधील 'पांडवनी' कलेच्या वारसदार तीजनबाई यांचे महाभारतावर आधारित कथानाट्य... कौशिकी चक्रवर्ती यांचे गायन... सतारवादक निलाद्री कुमार आणि तबलावादक पं. अनिंदो चटर्जी यांचे सादरीकरण हे यंदाच्या "वसंतोत्सव' संगीत महोत्सवाचे वैशिष्ट्य असणार आहे. हा महोत्सव 17 ते 19 जानेवारीदरम्यान न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग मैदान येथे आयोजिला आहे. यात कथक नृत्यांगना रोशन दाते आणि संगीततज्ज्ञ दीपकराजा यांना "वसंतराव देशपांडे स्मृती सन्मान' प्रदान करण्यात येणार आहे. "सकाळ' या कार्यक्रमाचा सहयोगी प्रायोजक आहे. 


 
प्रख्यात गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानतर्फे आयोजित हा महोत्सव सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळात होईल. संगीतातील विविध प्रवाहांचा मिलाफ रसिकांना या निमित्ताने अनुभवता येणार आहे, अशी माहिती डॉ. देशपांडे यांचे नातू आणि गायक राहुल देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सन्मानचिन्ह आणि 51 हजार रुपये रोख, असे सन्मानाचे स्वरूप आहे. त्याचप्रमाणे महोत्सवात युवा शास्त्रीय गायक लतेश पिंपळखरे यांना "वसंतराव देशपांडे उदयोन्मुख कलाकार' म्हणून गौरविण्यात येईल. 

महोत्सवात पहिल्या दिवशी (ता. 17) तीजनबाई या संगीताच्या साथीने महाभारतातील कथानाट्य सादर करतील. त्यानंतर राहुल देशपांडे यांचे गायन होईल. 

दुसऱ्या दिवशी (ता. 18) कौशिकी चक्रवर्ती आणि तबलावादक विजय घाटे यांच्या कलेचे सादरीकरण होणार असून, सतारवादक निलाद्री कुमार आणि तबलावादक पं. अनिंदो चटर्जी रसिकांना मंत्रमुग्ध करतील. 

'वसंतोत्सवा'च्या शेवटच्या दिवशी (ता. 19) ग्रॅमी पुरस्कार विजेते विक्‍कू विनायक यांचे सादरीकरण हे महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरणार आहे. घटमच्या साह्याने ते कर्नाटकी संगीतातील विविध पैलू उलगडणार आहेत. अभिजित पोहनकर, स्वप्नील बांदोडकर आणि राहुल देशपांडे या तीन युवा कलाकारांच्या उत्कंठावर्धक अदाकारीने महोत्सवाची सांगता होणार आहे. 

सीझन तिकीट उपलब्ध... तिघांसाठी सोफा : पाच हजार रुपये 
खुर्ची : 600 रुपये 
भारतीय बैठक : 200 रुपये 
तिकीट विक्रीचे स्थळ - बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, टिळक स्मारक मंदिर, शिरीष ट्रेडर्स येथे 8 जानेवारीपासून.

Friday, January 3, 2014

Wednesday, January 1, 2014

5th Swarzankar Music Festival




New English School Ramanbaug – 10th to 12th Jan 2014 – 6:00 PM to 10:00 PM


Date
Program
Fri, 10 Jan 2014
·         Smt. Ashwini Bhide-Deshpande
·         Pt Vishwa Mohan Bhatt & Salil Bhatt (Mohan Veena & Satvik Veena)
Sat, 11 Jan 2014
·         Pt Shivkumar Sharma
·         Pt Hariprasad Chaurasia
Sun, 12 Jan 2014
·         Begum Parveen Sultana
·         FUSION
Pt. Shivmani
Pt. Atulkumar Upadhye
Pt. Mukesh Jadhav
Shri Atul Raninga

Tickets: [Season]

Numbered Cushion Chair:3000/-
Numbered Chair:2000/-[discounted price 1000/-]
Unnumbered Chair: 1000/-[discounted price 500/-]
Bhartiya Baithak: 200/-
Bhartiya Baithak(For Students): 100/- (I-card Compulsory)


For Tickets Please Call- 9423557979 or 9420778277
Tickets also available at 
Prabhat Medicals, next to FTII Law College road. 
Mirazkar Musical's, Laxmi Road 

special discount available till 27th December 2013, hurry!!!!