Sunday, September 25, 2011

CONCERT: Pt. Venkatesh Kumar

Pt. Venkatesh Kumar to receive the Swarayoginee Dr. Prabha Atre Shastreeya Sangeet Puraskar.

Dr. Prabha Atre will be felicitated by Dr. H.V. Sardesai on her 80th birth year.


This will be followed by a concert by Pt. Venkatesh Kumar. He will be accompanied by Shri. Sanjay Deshpande and Shri. Suyog Kundalkar on Sunday, 25th Sept. 2011 at 5 pm at Tilak Smarak Mandir, Pune

Sunday, September 18, 2011

CONCERT: Kalapini Komkali and Anand Bhate

Two masteroes together performing live at Tilak Smarak Mandir on 18th Sept, 2011 from 5pm onwards. Both Anand Bhate and kalapanini taai will present gandharva gayan.


“सूर आरस्पानी”

“सूर आरस्पानी”
‘महाराष्ट्र कल्चरल सेंटर’तर्फे दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी सुदर्शन रंगमंच येथे संगीतविषयक मासिक उपक्रम चालवला जातो. या “सुदर्शन संगीत सभा” मालिकेतील तिसऱ्या भागात “सूर आरस्पानी” हा कार्यक्रम सादर होणार आहे.
“सूर आरस्पानी” या कार्यक्रमात रसिकांना १९०५ ते १९५५ या काळातील कलावंताच्या ध्वनिमुद्रित संगीताचे काही दुर्मिळ नमुने ऐकायला मिळतील. यात अब्दुल करीम खां, रहिमत खां, वझेबुवा, मास्तर कृष्णराव, बालगंधर्व, सुंदराबाई, मा. दीनानाथ, हिराबाई बडोदेकर, विनायकराव पटवर्धन, इ. लोकप्रिय कलाकारांसह बी. आर्. देवधर यांचा वाद्यवृंद, खाप्रूमाम पर्वतकरांचे तबलावादन, अल्लाउद्दीन खां यांचे व्हायोलिनवादन, इ. अन्यही दुर्मिळ स्वराविष्कार ऐकवले जातील. तसेच तत्कालीन महाराष्ट्रातील कीर्तन, लावणी, नाट्यगीत, काव्यगायन, भावगीत यांचेही वेचक नमुने सादर होतील.
पुण्यातील ध्वनिसंग्राहक संजय संत हे या कार्यक्रमाची प्रस्तुती करणार आहेत. तर संगीतकार चैतन्य कुंटे हे या कार्यक्रमातून गेल्या शतकातील भारतीय संगीत कसे होते, त्याचे ध्वनिमुद्रण कसे सुरु झाले, तत्कालीन कलाकार व त्यांची कला याबद्दल भाष्य करतील.


रविवार दि. १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. सुदर्शन रंगमंच येथे “सूर आरस्पानी” सादर होणार आहे.

“Soor Araspaani”: Music in 1905 to 1955
Maharashatra Cultural Centre presents a series “Sudarshan Sangeet Sabha” on every month’s third Sunday. In this series, this month connoisseurs can enjoy the early Gramophone recordings in India – during first 5 decades of 20th century in a special feature program “Soor Araspaani”.
Along with the popular performers such as Abdul Karim Khan, Rahimat Khan, Vazebuwa, Master Krishna, Bal Gandharva, Sundara Bai, Hirabai Barodekar, Vinayakrao Patwardhan, etc; some rare records such as Orchestra of B R Deodhar, Violin of Allauddin Khan, Tabla by Khaprumam Parvatkar, etc will be played. The music & musicians of Maharashtra in that era will also be portrayed with the forms like Keertan, Lawani, NatyaGeet, BhaawGeet, KaywaGayan, etc.
Pune based record collector Sanjay Sant will present the recordings and musicologist Chaitanya Kunte will speak about the artists and music in that era.

“Soor Araspaani” is organized on Sunday, 18th Sept 2011, 11am at Sudarshan Rangamanch, Shanivar Peth, Pune.

Friday, September 2, 2011

संगीतकार श्रीनिवास खळे यांचे निधन

आपल्या कर्णमधुर आणि भावपूर्ण गीतांनी मराठी रसिकांना सहा दशकांहून अधिक काळ मोहिनी घालणारे संगीतकार श्रीनिवास खळे यांचे आज (शुक्रवार) वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.
भावगीत, अभंग, बालगीते, पोवाडा यांच्यासह संगीताच्या अनेक क्षेत्रांमध्ये स्वत:चा खळे यांनी ठसा उमटविला होता. खळे यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारचा मानाचा पद्मभूषण पुरस्कारासह संगीतरत्न पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.