निव मिडिया इवेन्ट आणि पुष्पक सादर करीत आहे !
" अभिवृंद " द इंडियन क्लासिकल सिम्फनी.
शास्त्रीय संगीतातील प्रकारांच्या एकत्रित ( सामुहिक ) सादरीकरणाचा एक नवा दृक-श्राव्य अनुभव देणारा "अभिवृंद-द इंडियन क्लासिकल सिम्फनी” हा कार्यक्रम येत्या ६ ऑगस्ट , शनिवार रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड इथे सादर होत आहे.
बडा ख्याला पासून भैरवी पर्यंत अनेक संगीतप्रकार ( गायन, वादन, नृत्य ) समूहाने सादर होत असताना सुमारे १०० पाशिमात्य वाद्ये म्युझिकल च्या रुपात या प्रकारांची संगत करणार आहेत आणि हे या कार्यक्रमाचे वैशिष्ठ्य आहे.
"अभिवृंद-द इंडियन क्लासिकल सिम्फनी” या कार्यक्रमाची संकल्पना, निर्मिती व संगीत संयोजन हे तबला वादक निखील फाटक व संवादिनी वादक चिन्मय कोल्हटकर या जोडगोळीची आहे. या कार्यक्रमाचे निवेदनही निखील-चिन्मयच करणार आहेत.
दृक-श्राव्य संगीताचा अनोखा अनुभव देणाऱ्या या कार्यक्रमात राहुल देशपांडे, प्राची दुबळे, शर्वरी जमेनीस, सारंग कुलकर्णी, ओंकार दळवी, आमोद कुलकर्णी, अनय गाडगीळ, संदीप कुलकर्णी, निखील फाटक व चिन्मय कोल्हटकर हे एकूण दहा कलाकार सहभागी होत आहेत. सादरीकरणाचं एक नवीन रूप घेऊन अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत यामध्ये मांडलं जाणार आहे. काळानुरूप परंपरेला नवतेची जोड मिळत असते हि नवता वेगवेगळ्या रूपांतून परंपरेत सहभागी होत असते. "अभिवृंद-द इंडियन क्लासिकल सिम्फनी” हे त्याचंच एक उदहरण आहे.
हल्लीच्या “आयटमसाँग “ च्या जमान्यात आपल्या कानावर पडणारा आवाज अनेक वाद्यांच्या एकत्रित आविष्काराच्या रुपात असतो. हि “आयटमसाँग “ थोड्या कालावधीसाठी लोकप्रिय होतात, परंतु परंपरेने आपलाल्या दिलेलं संगीत ( शास्त्रीय ) हे वर्षानुवर्षं टिकणारं आहे. नवीन पिढीला या संगीताची गोडी लावण्यात "अभिवृंद-द इंडियन क्लासिकल सिम्फनी” सारखा कार्यक्रम नक्कीच एक चांगला हातभार लावेल.
सरोद, तबला, पखवाज, बासरी, या भारीतंय वाद्यांच्या जोडीला चेलो, ओबो, हॉर्न्स, गिटार, फोन्स यांसारखी पाशिमात्य वाद्ये भारतीय ट्युनिंग प्रमाणे ट्यून करून वाजणार आहेत. यामुळे विविध वाद्यांचा मेळ घालून तयार केलेलं शास्त्रीय संगीताचं हे रूप नक्कीच एक वेगळा आनंद देईल.
शास्त्रीय संगीताची अजिबात ओळख नसणारा कोणीही श्रोता या स्वरूपाच्या कार्यक्रमामुळे त्याकडे ओढला जाईल. एकत्रित सदरीकरणामुळे तसेच वाद्यमेळामुळे बडा ख्यालच्या बंदिशीचीसुद्धा एक ' धून ' ऐकणाऱ्याच्या मनात निर्माण होईल. या दृष्टीने या कार्यक्रमाचं वेगळेपण हे महत्वाचं आहे.
Saturday, August 6, 2011
Abhivrund-- Indian Classical Symphony
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
What time will it start?
Post a Comment