पं. छोटा गंधर्व हे मराठी रसिकांना एक नावाजलेले संगीत-नट म्हणून सुपरिचित असले तरी त्यांचा रागसंगीताही सखोल व्यासंग होता. नाट्यसंगीतातील दीर्घ कारकिर्दीबरोबरच पं. छोटा गंधर्वांनी ’गुनरंग’ या मुद्रेने अनेक बंदिशी बांधल्या, नवरागनिर्मिती केली.
छोटा गंधर्वांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या रागसंगीतातील योगदानावर प्रकाश पाडणारा विशेष कार्यक्रम सुदर्शन संगीत सभेच्या २१ व्या भागात सादर होत आहे. छोटा गंधर्वांचे शिष्य व संगीतकार विश्वनाथ ओक आणि गायिका माधुरी ओक हे औरंगाबादचे कलाकार दांपत्य हा कार्यक्रम पेश करणार असून छोटा गंधर्वांचे नवनिर्मित राग, बंदिशी यांचे सादरीकर ते करतील. तसेच छोटा गंधर्वांचे काही दुर्मिळ ध्वनिमुद्रणही रसिकांना ऐकायला मिळेल.
रविवार, दि. १७ मार्च २०१३ रोजी सकाळी ११ वा. सुदर्शन रंगमंच येथे हा कार्यक्रम महाराष्ट्र कल्चरल सेंटरने आयोजित केला आहे.
No comments:
Post a Comment