महाराष्ट्र कल्चरल सेंटर प्रस्तुत सुदर्शन संगीत सभा या दर महिन्याच्या तिसर्याी रविवारी होणार्या् उपक्रमामध्ये संगीतरसिकांना दरवेळी काहीतरी आगळेवेगळे ऐकायला मिळते आणि संगीताच्या आनंदाबरोबरच आपल्या जाणकारीतही भर पडल्याचा आनंद मिळतो. या महिन्याच्या सुदर्शन संगीत सभेच्या ९व्या पुष्पात ’इराणी संगीत’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमात इराणमधील संगीतकार सासन बाझगीर हे आपल्या सहकार्यांहसह पेशकश करतील, तसेच इराणी संगीताची माहितीही ते देतील. इराणी संगीत व भारतीय संगीत या दोन्ही संगीतपद्धतींतील नातेही रसिकांपुढे मांडले जाईल. रविवार, दि. १८ मार्च रोजी सकाळी ११ वा. सुदर्शन रंगमंच येथे हा कार्यक्रम सादर होईल.
Sunday, March 18, 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)
 
 
 
 Posts
Posts
 
 
No comments:
Post a Comment