Monday, October 27, 2014

Pune Book release function of-"Kaalajayi Kumar Gandharva"



1st Nov ,5 pm at Yashwant rao Chavhan auditorium.Punebook release by world renowned photographer Shri Raghu Rai and Poet/writer- critic-Shri Ashok Vajpeyi ,
followed by program-"Gandharva-Swar' by Bhuvanesh and Kalapini.

2nd Nov,10 am at film Archives hall ,Prabhat rd,- Along with audio-visual clippings of Kumarji,-"parisamvaad" in presence of Pt.Shankar Abhyankar (sitar player) by Satyasheel Deshpande (musician and disciple of Kumarji) ,Udayan Vajpeyi (poet-writer) and Amarendra Dhaneshwar (music critic).


Passes will be available from 24th October at Nawdikar brothers (opp yashwantrao chavhan audi,kothrud),Shirish traders(near Kamla Nehru park).


Tuesday, September 30, 2014

Monday, July 21, 2014

GaanPanditaa Padmavati Shaligram - Gokhale passed away

Got the news of sad demise of GaanPanditaa Padmavati Shaligram - Gokhale on Sunday 20 July 2014 ... It is indeed a great loss! She was one of the early rebellious female vocalists. Even though trained in Ustad Alladiya Khan's lineage, she created her own niche with adding flavours of Kirana Khayal and Patiala Thumri, her TaanKriya was very speedy & different from other contemporary female vocalists in Maharashtra. She also acted & sung in films in early 1930’s. Her music was very sweet though her tongue was very rude & adamant (that can be said as a trade mark of many Jaipur Gharana artists!). She performed till her 90’s with same zeal & virtuosity – very rare kind of artist she was! 


Monday, July 14, 2014

Sudarshan sangeet sabha: Tribal music - an introduction : by Prachi Dublay




“Tribal Music: An Introduction”

The tribal music of India is an area of research that is rarely explored. Prachi Dublay is a performer researcher in this rare field and has done extensive field work to explore India’s tribal music. In 31st episode of ‘Sudarshan Sangeet Sabha’, Prachi Dublay will present a lecture-demonstration on her experiences and observations on Tribal music of India. She will elaborate on the various aspects of tribal music along with singing and playing some audio-visual clips.
This lecture demonstration is organized by Maharashtra Cultural Centre on Sunday, 20th July 2014 at 11 am at Sudarshan Rangamanch, Pune. Donation passes will be available half hr. before the show at venue.

******************************************************************************
"आदिवासी संगीत : एक ओळख"
भारतातील अनेक आदिवासी जमातींचे संगीत आणि त्या संगीताशी असणारा सांस्कृतिक संबंध हा विषय फारसा हाताळला जात नाही. या विषयाच्या अभ्यासिका प्राची दुबळे यांनी गेली काही वर्षे प्रत्यक्ष आदिवासींमध्ये राहून या संगीताचा अभ्यास केला आहे. त्यांच्याकडून आदिवासी संगीताबद्दल जाणून घेण्याची संधी रसिक आणि अभ्यासकांना "आदिवासी संगीत : एक ओळख" या सप्रयोग व्याख्यानात मिळणार आहे. सुदर्शन संगीत सभा या उपक्रमाच्या अंतर्गत ३१ व्या भागात आदिवासी गीतांच्या गायनासह ही विशेष प्रस्तुती गायिका-संशोधिका प्राची दुबळे करणार असून त्या प्रत्यक्ष आदिवासींच्या ध्वनि-चित्रफितीही दाखवतील. अभ्यासक संगीतकार चैतन्य कुंटे त्यांच्याशी संवाद साधतील. रविवार, दि. २० जुलै रोजी सकाळी ११ वा. सुदर्शन रंगमंच येथे हा कार्यक्रम होणार असून देणगी प्रवेशिका अर्धा तास आधी उपलब्ध होतील.

******************************************************************************

CONCERT: Arati Thakur-Kundalkar

Thursday, July 10, 2014

Wednesday, June 25, 2014

CONCERT: संस्कार भारती मासिक संगीत सभा

संस्कार भारती,पुणे महानगर व देवदेवेश्वर संस्थान सारसबाग आयोजित मासिक संगीत सभेचा शुभारंभ, सर्व रसिकांना सस्नेह निमंत्रण!!

Monday, June 9, 2014

Prabhat Geete

‘प्रभात’ चित्रसंस्थेच्या अयोध्येचा राजा, अमृतमंथन, धर्मात्मा, संत तुकाराम, कुंकू, गोपालकृष्ण, माणूस, संत ज्ञानेश्वर, शेजारी, रामशास्त्री इ. गाजलेल्या चित्रपटांतील
गोविंदराव टेंबे, केशवराव भोळे, मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर या संगीतकारांची गीते ऐकण्याचा योग उद्या, मंगळवार दि. १० जून २०१४ रोजी रसिकांना मिळत आहे – 

या ‘प्रभात’गीतांच्या सादरीकरणाच्या बरोबरच काही दुर्मिळ गीते प्रत्यक्ष चित्रपटातील निवडक दृश्यांतून बघायलाही मिळतील.

हा दृक-श्राव्य कार्यक्रम उद्या सायं. ६ वा. बालशिक्षणमंदिर सभागृहात होणार आहे.

रसिकांनी व संगीताच्या अभ्यासकांनी जरूर यावे !



Tuesday, June 3, 2014

धोंडूताई कुलकर्णी यांचे निधन

dhondutai

जयपूर-अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका धोंडूताई कुलकर्णी (८६) यांचे रविवारी मुंबईत निधन झाले. किडनीचा आजार बळावल्याने त्यांना जोगेश्वरी येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने शास्त्रीय संगीतातील एक पर्व संपले अशी भावना संगीत क्षेत्रातील मान्यवरांकडून व्यक्त होत आहे.

संगीत आराधना हेच ध्येय
कोल्हापूरमध्ये सन १९२७ मध्ये जन्मलेल्या धोंडूताई कुलकर्णी यांना गोड गळ्याची निसर्गदत्त देणगी लाभली होती. वयाच्या आठव्या वर्षी त्या 'आकाशवाणी'वर पहिल्यांदा गायल्या होत्या, पण त्यांना शास्त्रीय संगीताचे वेड त्याहीआधी म्हणजे वयाच्या पाचव्या वर्षांपासूनच लागले होते. संगीत आराधना हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते.

वयाच्या दहाव्या वर्षांपासून त्यांनी खऱ्या अर्थाने आपले संगीतशिक्षण सुरू केले. पुढे दहा वर्षे त्यांनी भुर्जी खाँसाहेब यांच्याकडे जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रशुद्ध गायकीचे धडे घेतले. लक्ष्मीबाई जाधव आणि नंतर सुरश्री केसरबाई केरकर यांच्याकडेही संगीत आराधना करून त्यांनी जयपूर घराण्याची शास्त्रशुद्ध गायकी आत्मसात केली. केसरबाईंचे शिष्यत्व स्वीकारलेल्या धोंडूताईंनी १९६२ ते ७१ या काळात त्यांच्याकडून संगीताचे धडे घेतले.

संगीत आराधना हेच आपल्या जीवनाचे ध्येय असल्याची प्रतिज्ञा धोंडूताईंनी केली होती आणि त्यासाठी त्यांनी विवाह केला नाही. त्यांनी कधीही गाण्याचा बाजार मांडला नाही की ग्लॅमर आणि प्रसिद्धीचा मोह धरला नाही. आकाशवाणीसह त्यांनी देशाच्या अनेक शहरात संगीताच्या मैफिली केल्या. या वयातही त्या संगीताचा रियाज नियमितपणे करीत. ज्ञानाची प्रक्रिया अखंडपणे सुरूच असते, त्याला कधी पूर्ण विराम देता येत नाही असे धोंडूताई सांगत.

जयपूर-अत्रौली घराण्याची वैशिष्ट्ये असलेल्या ख्याल, भजन, गायकीच्या बंदिशी सादर करणे यात त्यांचा हातखंडा होता. गाण्यावर असलेली अढळ निष्ठा, प्रेम, अपार मेहनतीमुळे प्रवाहाविरोधात जाऊन त्यांनी स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले होते. राज्य सरकारचा जीवन गौरव पुरस्कार, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, यावर्षीचा चतुरंग संगीत सन्मान आदी अनेक मानाच्या पुरस्कारांवर धोंडूताईंनी आपले नाव कोरले होते. गायक आदित्य खानवे आणि ऋतुजा लाड आदी शिष्य त्यांची गायकीची परंपरा पुढे चालवत आहेत.

'आदर्श घालून देणारं व्यक्तिमत्त्व' धोंडूताईंच्या गाण्यात लक्ष्मीबाई जाधव यांच्या गाण्याच्या स्पष्ट खुणा दिसत. तरी त्यांनी केसरबाई, भुर्जी खाँसाहेब यांच्याकडून घेतलेल्या शिकवणुकीला आपल्या गाण्यातून वाव दिला. म्हणूनच अल्लादिया खाँसाहेबांकडून आलेले तालाचे खंड धोंडुताईंनी आत्मसात केले होते.

माझ्यालेखी आदर्श घालून देणारं असं ते व्यक्तिमत्त्व होतं. कोणत्याही ग्लॅमरला न भुलता, पुरस्कार-सत्कार सोहळे यांच्या मागे न लागता, या सर्वांपलीकडे पोचून त्यांनी गानसाधना केली. आपल्या घराण्याचं गाणं पुढे नेणाऱ्या प्रत्येक कलाकाराला त्या ज्ञान देत गेल्या. त्यांच्या जाण्याने अस्तित्वात असलेली विद्या गेली आहे. या समर्पित योगिनीला माझे शतशः प्रणाम. - श्रुती सडोलीकर-काटकर

कणखर धोंडूताई कुलकर्णी या कणखर व्यक्तिमत्वाच्या गायिका होत्या. केशरबाई केरकर, उस्ताद भुर्जी खाँ, लक्ष्मीबाई जाधव यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय शिक्षणाचे धडे घेतले. अखेरपर्यंत त्यांनी परंपरागत गायिकीची कास सोडली नाही. निधनाच्या आधी दोन महिन्यांपर्यंत त्या शिकवत होत्या. त्यांचे गाणे विद्वत्तापूर्ण आणि शुद्ध आकाराचे होते. जयपूर घराण्याची खासियत त्यांनी नव्या पिढीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली. त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही मिळाला होता. - मुकुंद मराठे, गायक

शिस्तबद्ध गाणे धोंडूताई जयपूर घराण्याच्या मोठ्या गायिका होत्या. जयपूरला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचा सहवास मिळाला. त्यांचे गाणे जवळून ऐकता आले. अत्यंत शुद्ध आणि शिस्तबद्ध गायकी होती त्यांची. त्यांच्या गायिकीच्या तुलनेत त्यांना प्रसिद्धी मिळाली नाही. परंतु जयपूर घराण्याचा वारसा त्यांनी नव्या पिढीपर्यंत पोहोचवला. त्यांचे जाणे धक्कादायक आहे. - उल्हास बापट, गायक

Thursday, May 8, 2014

Veteran vocalist Pandit Sangameshvar Gurav passed away

Veteran vocalist Pandit Sangameshvar Gurav (born in 1931) passed away last night, i.e. on 7th May 2014 around 10:30 PM at the age of 83. Let his soul be in solace ! 

Wednesday, May 7, 2014

Saturday, April 26, 2014

Wednesday, March 12, 2014

Sudarshan Sangeet Sabha: Hori Geet

महाराष्ट्र कल्चरल सेंटर प्रस्तुत
सुदर्शन संगीत सभा - भाग २
"होरी-गी"
गोहरजान, मलकाजान, रहिमत खां, बाई सुंदराबाई, मास्तर कृष्णराव, हिराबाई बडोदेकर यांच्यापासून कुमार गंधर्व, शोभा गुर्टू, सरला भिडे, गिरिजादेवी इ. अनेक कलाकारांचे 'होरी गीतांचे' आविष्कार
सादरकर्ते : श्री. चैतन्य कुंटे
रविवारदि. १ मार्च रोजी सकाळी ११ वा. सुदर्शन रंगमंच, पुणे येथे.
देणगी प्रवेशिका अर्धा तास आधी उपलब्ध होतील.
*********************************************************************************** 
Maharashtra Cultural Centre presents
Sudarshan Sangeet Sabha – episode 29
Hori Geet
A special listening session on Hori With rare recordings of Gauhar Jan, Indu Bala, Malka Jan, Janki Bai, Bai Sundara Bai, Rasoolan Bai, Mehboob Jan, Kesarbai Kerkar, Hirabai Barodekar, Azambai, Rahimat Khan, Master Krishnarao, Kumar Gandharva, Shobha Gurtu, Sarla Bhide, Girija Devi, etc.
Presenter: Musicologist & composer Chaitanya Kunte
Date & Time: Sunday, 16th March 2014 at 11 am.
Venue: Sudarshan Rangamanch, Pune.
Donation passes will be available half hr. before the show at venue.

Monday, February 24, 2014

CONCERT: Adi Dev Mahadev

Maharashtra Cultural Centre presents
“Adi Dev Mahadev”
A special concert of Bandishes depicting Lord Shiva from the repertoire of BhendiBazar Gharana
on the occasion of MahaShivaratri
Singers: Dr. Suhasini Koratkar and Shripad Bhave
Accompaniment: Chaitanya Kunte (Harmonium) & Arun Gawai (Tabla)
Compere: Rajashree Mahajani
Date & Time: Saturday, March 1st 2014, 6 PM
Venue: Sudarshan Rangamanch, Near Ahilya Devi High School, Pune.
(Entry free to all)
**********************************************************************************

शिवस्तुतीपर बंदिशींची मैफील
महाराष्ट्र कल्चरल सेंटर संस्थेने महाशिवरात्री निमित्त ज्येष्ठ गायिका डॉ. सुहासिनी कोरटकर यांच्या “आदी देव महादेव” या शिवस्तुतीपर रचनांच्या विशेष मैफिलीचे आयोजन केले आहे. भेंडीबझार घराण्याचे उस्ताद अमान आली खां हे जन्माने मुस्लीम असले तरी त्यांनी 'अमर' या मुद्रेने हिंदू देवतांचे वर्णन असलेल्या अनेक सुंदर बंदिशी रचल्या होत्या. त्याच परंपरेतील डॉ. कोरटकर यांनीही 'निगुनी' या मुद्रेने अनेक आशयपूर्ण बंदिशी रचल्या आहेत. अशा काही निवडक बंदिशी बंदिशी डॉ. सुहासिनी कोरटकर व श्रीपाद भावे सादर करतील. त्यांना चैतन्य कुंटे (हार्मोनिअम) व अरुण गवई (तबला) हे साथ करतील व राजश्री महाजनी या निवेदन करतील. हा कार्यक्रम शनिवार, १ मार्च २०१४ रोजी सायं ६ वा. सुदर्शन रंगमंच, पुणे येथे होणार असून सर्व रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे. 
**********************************************************************************

Thursday, February 13, 2014

CONCERT: Shri Ken Zuckerman (Sarod)

CONCERT: Dhananjay Dhaithankar - Santoor

Kala Chhaya presents Kathak Mahotsav

Kathak presentations of 3 major gharanas from the maestros


14th Feb. 2014 at 6.00 pm
Inauguration of the Kathak Ganga Sagar at the hand of Smt. Sitara Devi

Banaras Gharana Presentation - Guru Smt. Sitara Devi ji 
Dancers - Smt. Jayantimala, Smt Richika & Shri Vishal Krishna

15th Feb. 2014 at 6.00 pm
Jaipur Gharana Presentation - Guru Smt. Shashi Sankhala 
Dancers - Smt, Geetanjali Singh, Smt. Reema Goyal, Shri,Yatendra Saxena & Rajeev Singh

Raigad Gharana Presentation - Guru Ramlalji 
Dancers - Smt. Alpana Vajpayi & Shrishti Gupta

16th Feb. 2014 at 66pm
Lucknow Gharana Presentation - Guru Pt. Birju Maharaj ji 
Dancers - Pt. Jaikishan Maharaj, Smt. Mamta Maharaj & 
Jamuna Jamuna kit baaro shaam... By Kalachhaya

Accompaniment : Pt. Arvindkumar Azad, Mohd. Zafar, Shahnavaz Khan, Bharat Jangam (Tabla) Praveen Arya, Sanjay Agle (Pakhawaj), Sunil Avachat (Flute) Sandeep Mishra, Javed Khan (Sarangi), Shri Harihar Sharan (sitar) Shri Somnath Mishra, Shri Munnalal Bhat, Rasika Kulkarni & Shrikant Pargonkar (Vocal)


Thursday, January 23, 2014

Wednesday, January 22, 2014